पिंपरी-चिंचवड : अजित पवारांच्या जाहीरनाम्यावरून खासदार अमोल कोल्हे यांनी जहरी टीका केली आहे. महायुतीचे आश्वासन म्हणजे केवळ पोकळ दावे असल्याचा टोला कोल्हे यांनी लगावला आहे. अजित पवारांच्या जाहीरनाम्यात एक प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. एक ओळ छापायची राहून गेली. आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ असं म्हणत कोल्हे यांनी जाहिरनाम्याची खिल्ली उडवली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, जाहीरनाम्यात कदाचित प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. त्यात एक ओळ छापायची राहून गेली. आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यावर तब्बल साडेआठ लाख कोटींच कर्ज असताना अडीच वर्षात असंविधानिक आणि पक्ष फोडून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. हे त्यांनी कशासाठी केलं?,असा प्रश्न निर्माण होतो.

आणखी वाचा-Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान “छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर मुंब्र्यात उभारुन दाखवा, आम्ही..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, पक्ष फोडून, चिन्ह पळवून, पक्षाच नाव घेऊन जे काही मिळालं. त्यांनी साध्य काय केलं. लोकसभेत मतदान कमी पडल्याने लाडकी बहीण योजना काढली. असा टोला देखील लगावला आहे. पुढे ते म्हणाले, दोन- अडीच महिन्यात अनेक योजनांचा निधी ठराविक योजनेकडे वळवण्यात आला. इतर सर्व योजना वाऱ्यावर सोडण्यात आल्या. भाव स्थिर ठेवण्याच आश्वासन या सरकारने दिलं. हे हास्यास्पद आहे. गेल्या दोन वर्षात दहा जीवनावश्यक वस्तूंचे भाव या सरकारने स्थिर ठेवले आहेत का? हे उत्तर या सरकारने द्यावं. पुढे ते म्हणाले, महायुतीच आश्वासन हे केवळ पोकळ दावा आहे. सत्तेत येणार नसल्याने वाटेल ती आश्वासने हे सरकार जाहिरनाम्यातून देत आहे.