चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपा आणि महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे. अपक्ष उमेदवार ही जोर लावत असून उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५१० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. दरम्यान, बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे पुन्हा एकदा चर्चेत आले असून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात शिट्टी फुंकत राहुल कलाटेंचा अप्रत्येक्षपणे प्रचार केल्याचं बोललं जात असून तो व्हिडिओ चिंचवड मतदारसंघात व्हायरल होतो आहे.

हेही वाचा- सावधान ! घरगुती सिलेंडरमधून गॅस भरताना कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

राहुल कलाटे आणि अभिनेते, खासदार अमोल कोल्हेंची मैत्री सर्वश्रुत आहे. नागपूरच्या एका कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी शिट्टी फुंकून अप्रत्यक्षपणे राहुल कलाटे यांचा प्रचार केल्याची चर्चा चिंचवड मतदारसंघात रंगली आहे. अमोल कोल्हे यांचा तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाविकास आघाडी चे बंडखोर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून अजित पवारांसह भाजपाच्या विरोधात त्यांनी दंड थोपटल्याचे चित्र सर्वांनी पाहिले आहे. अजित पवार आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी केली होती. परंतु, त्यांनी माघार घेतली नाही. कलाटे यांच्यावर अजित पवारांसह शरद पवार यांनी देखील टीका केली होती. भाजपाने देखील त्यांचा समाचार घेतला होता. कलाटे यांना वीस हजार मते पडतील असे भाकीत ही अजित पवारांनी भर सभेत केलेले आहे. असे असताना राष्ट्रवादी चे खासदार अमोल कोल्हे यांनी मात्र नागपूरच्या एका कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी राहुल कलाटे यांचे प्रचार चिन्ह शिट्टी फुंकून कलाटे यांचा अप्रत्येक्षपणे प्रचार केल्याची चर्चा चिंचवड मतदारसंघात सुरू झाली आहे.

हेही वाचा- कारवाईच आश्वासन दिल्यानंतर रविंद्र धंगेकरच यांचे आंदोलन स्थगित

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी नेत्यांची फौज चिंचवड मतदारसंघात पाहायला मिळालेली. बाईक रॅली, सभा, मेळावे मतदारसंघात घेण्यात आले. अशा वेळी बंडखोर राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी कोल्हे धावून आल्याचे बोललं जात आहे. अमोल कोल्हे यांनी राहुल कलाटे यांचा अप्रत्यक्षपणे प्रचार केला असून त्यांनी त्यांची मैत्री जपली का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे चिंचवडमध्ये महाविकास आघाडी चे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आल्याचे पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे अनेक चर्चा चिंचवडमध्ये रंगल्या आहेत.

हेही वाचा- “कसब्यात भाजपाने पोलिसांना बरोबर घेऊन पैसे वाटले”; रविंद्र धंगेकरांचा मोठा आरोप

“माझी आणि अमोल कोल्हे यांची राजकारणापलीकडील मैत्री आहे, ते एक चांगले मित्र आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओ विषयी मला माहिती नाही. तस असेल तर त्यांनी आमची मैत्री जपली असेल, असे मत बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.