हाॅटेलमध्ये कोयते उगारुन टोळक्याने तोडफोड केल्याची घटना भवानी पेठेत घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपली असून लष्कर पोलिसांकडून टोळक्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोनीष शशीकांत म्हेत्रे (वय ३९ रा. भवानी पेठ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- विश्लेषण : पुण्यातील कोयता गँगची दहशत कोण मोडणार?

municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

म्हेत्रे यांचे भवानी पेठेत निशा हाॅटेल आहे. मोनीष आणि त्यांचा मोठा भाऊ शैलेश हाॅटेल चालवितात. दुपारी दुचाकीवरुन पाच ते सहा जण हाॅटेलच्या परिसरात आले. टोळक्यातील पाच ते सहा जणांनी चेहरा रुमालाने झाकला होता. गज, कोयते घेऊन आरोपी हाॅटेलच्या परिसरात आले. मोनीष यांना धमकावून शिवीगाळ केली. तुमची हाॅटेल चालवायची लायकी आहे का, असे म्हणून चोरट्यांनी कोयते उगारुन तोडफोड केली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.