जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीत कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी गजाआड केले. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. टोळक्याकडून चार कोयते आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- संगकारा यांची प्रकृती ठणठणीत, पुढील सामन्यासाठी राजकोटमध्ये दाखल

रणजीत रघुनाथ रामगुडे (वय २०), रोहन गोरख सरक (वय १९,दोघे रा. सुतारवाडी, पाषाण), विशाल शंकर सिंह (वय १८, रा. संगमवाडी, येरवडा), आदित्य राजेश वडसकर (वय १९, रा. शिवाजीनगर गावठाण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीत आरोपी रणजीत, रोहन, विशाल, आदित्य आणि अल्पवयीन साथीदारांनी कोयते उगारुन दहशत माजविली होती. खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हेही वाचा- विश्लेषण : पुण्यातील कोयता गँगची दहशत कोण मोडणार?

पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. आरोपींना सापळा लावून पकडण्यात आले. पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखेचे निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजीत फडतरे, आदेश चलवादी आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrested a gang that was terrorizing khau galli on jangli maharaj road pune print news rbk 25 dpj
First published on: 07-01-2023 at 15:29 IST