लोणावळा: लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी वडगाव मावळ येथील जुगार अड्ड्यावर थेट छापा मारून जुगार खेळत असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. वडगाव मावळच्या हद्दीतील आंबेडकरनगर मधील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शेजारी असलेल्या पत्रा शेडमध्ये हा गोरख धंदा सुरू होता. जुगार सुरू असलेल्या ठिकाणाहून सहा लाख ४१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी थेट कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

आणखी वाचा-‘डाव्या’ विचारसरणीला रोखण्यासाठी सजग राजकीय भूमिका हवी; सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोणावळ्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना माहिती मिळाली की वडगाव मावळ या ठिकाणी काही व्यक्ती जुगार खेळत आहेत. तातडीने त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टाफसह सत्यसाई कार्तिक यांनी छापा मारला. आरोपींकडून जुगाराची साधने जप्त केली असून १० मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आरोपींकडून एकूण ६ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नऊ जणांविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम सन १८८७ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गणेश उत्सव येत असून यादरम्यान मंडळाच्या सदस्यांनी जुगार म्हणजेच पत्ते खेळू नयेत असं आवाहन देखील सत्यसाई कार्तिक यांनी केलं आहे.