पुणे: चांदणी चौकात पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ब्रेक निकामी झाल्यानंतर बसने रस्त्याच्या कडेला लावलेल्या चार ते पाच वाहनांना धडक दिली. अपघातात तिघे जण किरकोळ जखमी झाले.

कोथरूड भागातील पौड रस्त्यावर पीएमपीचे आगार आहे. पौड रस्त्यावरील आगारात सीएनजी भरण्यासाठी पीएमपी बस निघाली होती. चांदणी चौकातील उतारावर पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाले.

बसचालकाचे नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला लावलेल्या चार ते पाच वाहनांना बसने धडक दिली. अपघातात तिघे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोेलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.

अपघातात सुदैवाने काेणी गंभीर जखमी झाले नाही. बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची माहिती चालकाने दिली. अपघातानंतर काही काळ चांदणी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली, असे पोलीस उपायुक्त कदम यांनी सांगितले. अपघातानंतर या भागात गर्दी झाली होती. या भागात पीएमपी बस नादुरस्त होऊन बंद पडण्याचे प्रकार सातत्याने घडतात, असे नागरिकांनी सांगितले.