पिंपरी-चिंचवड: मान्सून वेळेच्या आधी आल्याने मावळ, लोणावळा येथे पर्यटक गर्दी करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत जोरदार पाऊस झाला आहे. भुशी धरण ही ओसंडून वाहत आहे. धरणाच्या पाऱ्यांवरून पांढरे शुभ्र पाण्यामध्ये मनसोक्त खेळण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून पर्यटकांनी गर्दी केली आहे. पुणे, मुंबई इथून मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळा शहरात दाखल झाले आहेत. भुशी धरण वगळता इतर पर्यटनस्थळी जिल्ह्याधिकारी यांनी प्रतिबंध केला आहे. तरीही त्या ठिकाणी हा प्रतिबंध झुगारून पर्यटक मौज- मजा करत आहेत. काही दिवसांपूर्वी तळेगावच्या कुंडमळा येथे लोखंडी पूल पडलेल्या दुर्घटनेत ५० पेक्षा अधिक जखमी आणि चार पर्यटकांचा मृत्यू झालेले आहे. हे बघता पर्यटकांनी स्वतः ची काळजी घेऊन पर्यटन करावं असं वारंवार प्रशासनाडून आवाहन करण्यात येत आहे.
भुशी धरण परिसरात दरवर्षी अपघात घडतात. धबधब्याच्या दिशेने पर्यटक जात असतात. अशा अनोळखी ठिकाणी जाण पर्यटकांनी टाळायला हवं. तरुणांनी सय्यम बाळगला पाहिजे. जेणेकरून अपघात घडणार नाही. सहयाद्रीचा पर्वतरांगा हिरवागार दिसत आहेत. दऱ्यांमधून पांढरे शुभ्र असे धबधबे कोसळत आहेत. धबधब्यांखाली थांबून पाण्याचा आनंद घेत असताना काळजी घ्यावी. डोंगरावरील दगडी कोसळण्याची शक्यता असते. लोणावळा पोलिसांनी जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. तरीही काही ठिकाणी पर्यटक हुल्लडबाजी करताना दिसत आहेत.