पुणे : एकूण अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ दोन पानी धडा हे अन्याय करण्यासारखे आहे. आजचे हे सोन्याचे दिवस कोणामुळे आले हे नव्या पिढीला कळण्यासाठी नवीन अभ्यासक्रमात ३० टक्के अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले यांच्या चरित्राचा समावेश असेल, अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली. अभ्यासक्रमाच्या चौकटीत बांधल्यामुळे महापुरुषांचा अभ्यास करणे सक्तीचे होईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटात पाच जागा बिनविरोध; उर्वरित पाच जागांसाठी मतदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३५६ व्या आग्य्राहून सुटका स्मृतिदिनानिमित्त किल्ले राजगड उत्सवांतर्गत लाल महाल येथून लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याने किल्ले राजगडसाठी प्रस्थान ठेवले. त्या कार्यक्रमात पाटील यांनी पालखीचे पूजन केले. त्या प्रसंगी ते बोलत होते. पाटील म्हणाले, नवीन अभ्यासक्रमात ७० टक्के व्यवसाय-नोकरीसाठी, ३० टक्के महापुरुषांची चरित्रे, योग, कला आदींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य कळण्याच्या दृष्टीने १०० गुणांचा पेपर ठेवण्यात येईल.