प्रथमेश गोडबोले

पुणे : लोकसभेच्या माढा आणि बारामती मतदारसंघांसह विधानसभेच्या दौंड, पुरंदर, हवेली, भोर, फलटण, माळशिरस अशा मतदारसंघांसाठी महत्त्वाचे असणारे निर्णय नुकतेच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत. नीरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाला ३९७६.८३ कोटी रुपयांची तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील भोर, साताऱ्यातील खंडाळा व फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या भागांना फायदा होणार आहे.

तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेला ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता याच बैठकीत देण्यात आली. नीरा देवघर या प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ६६७० हेक्टर, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खंडाळा तालुक्यातील ११ हजार ८६० हेक्टर आणि फलटण तालुक्यातील १३ हजार ५५०, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहा हजार ९७० अशा एकूण ४३ हजार ५० हेक्टर क्षेत्राला प्रवाही आणि उपसा सिंचनाने लाभ मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेस ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागातील ६३ गावांत २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

  माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. सन २००९ मध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढय़ातून निवडणूक लढवली होती आणि ते जिंकलेही होते. मात्र, सध्या या मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे भाजपचे खासदार आहेत. माढय़ात करमाळा, माळशिरस, माढा, सांगोला हे सोलापुरातील चार, तर साताऱ्यातील फलटण आणि माण हे विधानसभा मतदारसंघ येतात.