या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आई आजारी असून पैशाची खूप गरज आहे, असे सांगून पैशांची मागणी करत चार महिला आमदारांची गुगल पे वरून आर्थिक फसवणूक करणाऱ्या औरंगाबाद येथील मुकेश राठोड आणि सुनिता क्षीरसागर या बंटी-बबलीच्या जोडीला अटक करण्यात अखेर बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही जण स्पर्धा परीक्षेची तयार करत असल्याचे देखील तपासात समोर आले आहे.

पुणे : पद्मावती भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’ची कारवाई

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील मुकेश राठोड आणि सुनिता क्षीरसगार हे दोघेही शेतकरी कुटुंबातील असून, तीन वर्षांपासून औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्या दोघांच्या घऱची परिस्थिती बेताची असल्याने, घरून रूम भाडे, मेस इत्यादीसाठी घरी पैसे मागणे योग्य नसल्याने, त्या दोघांनी लोकप्रतिनिधींकडून आई आजारी असल्याचे सांगून गुगल पे द्वारे पैसे मागण्यास सुरुवात केली.

या महिला आमदारांनी पैसे दिले –

त्याच दरम्यान त्यांनी भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ, आमदार मेघना बोर्डीकर साकोरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार श्वेता महाले यांना आई आजारी आहे आणि पैशांची खूप गरज आहे, असे सांगितले. त्यानंतर माधुरी मिसाळ यांनी ३ हजार ४००, देवयानी फरांदे – ४ हजार, श्वेता महाले – ३ हजार ७०० रुपये त्यांना दिले. तर आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांनी पैसे दिले नाहीत. त्यानंतर एवढ्यावरच हे दोघे थांबले नाहीत, त्यांनी इतर आमदारांना देखील फोन करून पैशांची मागणी केली.

औरंगाबादेत सापळा रचून पकडले –

त्याच दरम्यान मुंबईत पक्षाची बैठक होती. त्यावेळी चारही आमदार एकत्रित गप्पा मारत असताना. गुगल पे वरून एकाला पैसे दिल्याचे चर्चेमधून समोर आले. त्यानंतर फसवणुक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार माधुरी मिसाळ यांची मुलगी पूजा यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात झाली त्यावेळी ते दोघे औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यावर, दोघांना तेथून सापळा रचून अटक करण्यात आली. त्या दोघांकडे चौकशी केल्यावर, तीन आमदारांकडून घेतलेले पैसे परत दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर, संपूर्ण प्रकरणी चौकशी सुरू असून त्यानंतर नेमकं किती जणांचे पैसे घेतले. ते दोघे किती जणांच्या संपर्कात आले. या बद्दल माहिती समजू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bunty bubli duo arrested for asking money from women mlas online msr 87 svk
First published on: 21-07-2022 at 15:38 IST