पुणे : राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाअंतर्गत भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर अनेक गैरप्रकार झालेली, पोलिसात तक्रारी दाखल झालेली तलाठी भरती का रद्द केली जात नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित पदासाठी २० आणि २१ फेब्रुवारी रोजी टीसीएस कंपनीमार्फत घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेदरम्यान औरंगाबाद केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या परीक्षेवर उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षा व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

हेही वाचा…पिंपरी : थेरगावात ६० खाटांचे कर्करोग रुग्णालय

तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकारांबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतले आहेत, तसेच त्या विरोधात आवाज उठवला आहे. जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा हा निर्णय चांगला आहे, पण या परीक्षांपेक्षा जास्त घोळ तलाठीमध्ये झाला आहे. मग तलाठी भरती का रद्द केली जात नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. तलाठी भरतीवर जवळपास नऊ एफआयआर दाखल आहेत.

हेही वाचा…साखरेची ‘गोड’ बातमी : यंदा साखर मिळणार मुबलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लातूरमध्ये पूर्ण केंद्रच मॅनेज होते हे सिद्ध झाले आहे, ते केंद्रही बंद केले आहे तरी तलाठी भरती रद्द का नाही? यांच्यात कोणाचे हितसंबंध आहेत का? जवळपास 74 जण संशयित म्हणून महसूल विभागाने यादी जाहीर केली आहे, तरीही तलाठी नियुक्ती दिली जात आहे, अशी टीकाही समितीने एक्स या समाजमाध्यमाद्वारे केली.