scorecardresearch

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्ल्यू टूथ यंत्राचा वापर परीक्षार्थी अटकेत

सिंहगड महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात केवलिसंग परीक्षा देत होता.

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्ल्यू टूथ यंत्राचा वापर परीक्षार्थी अटकेत
( संग्रहित छायचित्र )

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या गट-क सेवा मुख्य परीक्षेत ब्ल्यू टूथ यंत्राचा वापर करणाऱ्या एका परीक्षार्थीस पोलिसांनी अटक केली.

केवलिसंग चेनसिंग गुशिंगे (वय ३०, रा. होनोबाची वाडी, पैठण, ओैरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या परीक्षार्थीचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षक संतोष बाळासाहेब ताम्हाणे (वय ४५) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क सेवा मुख्य परीक्षा नुकतीच पार पडली. सिंहगड महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात केवलिसंग परीक्षा देत होता. परीक्षा केंद्रात इलेक्ट्रॅानिक साधनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली होती. केवलसिंग याच्याकडे मोबाइल संच तसेच ब्ल्यू टूथ यंत्र वापरत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याच्या ताब्यातून मोबाइल संच तसेच ब्ल्यू टूथ यंत्र जप्त करण्यात आले. केवलसिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या