पुणे : कर्नाटकातील चडचंण टोळीचा म्होरक्यासह साथीदारांना पर्वती पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि २५ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मंड्ड उर्फ माडवालेय्या पंचय्या हिरेमठ (वय ३५, रा. विजापूर, कर्नाटक, सध्या रा. पिसोळी उंड्री), सोमलिंग गुरप्पा दर्गा (वय २८ रा. कर्नाटक), प्रशांत गुरुसिध्दप्पा गोगी (वय ३७ रा. शिवशंभो नगर, कात्रज कोंढवा रस्ता, मूळ रा. सुरपूर जि. यादगिर, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कर्नाटकमधील धर्मराज चडचंण टोळीचा म्होरक्या मंड्ड हिरेमठ साथीदारांसह पुण्यात येणार असल्याची माहिती पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथसकाने लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ सापळा लावून त्यांना पकडले. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि २५ काडतुसे जप्त करण्यात आली. टोळीच्या मुसक्या आवळल्या. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपनिरीक्षक सचिन पवार, हवालदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, दयानंद तेलंगे पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, प्रवीण जगताप यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा…पिंपरी पोलिसातील हवालदाराचे होत आहे कौतुक, शरीर सौष्ठव स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर कर्नाटकातील टोळीयुद्ध

उत्तर कर्नाटकमध्ये धर्मराज चडचंण आणि महादेव बहिरगोंड (सावकार) टोळयांमध्ये वैमनस्य आहे. पोलीस चकमकीत धर्मराजचा मृत्यू झाला होता. त्याचा भाऊ गंगाधर चडचंणचा खून महादेव सावकार याच्या टोळीने केली हाती. त्यानंतर मंडु ऊर्फ माडवालेय्या पंचय्या हिरेमठने चडचण टोळीची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर महादेव सावकारवर ४० साथीदारांनी पिस्तुलातून गोळीबार केला होता. गोळीबारात महादेव बचावला होता. गेल्या दोन महिन्यांपासून मंडू हिरेमठ कुटुंबीयांसह कोंढव्यातील उंड्री परिसरात राहत होता.