पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी भाजपकडून ९९ जणांची यादी जाहीर केली होती.त्या यादीत पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा होताच मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला होता.त्यानंतर चंद्रकांत पाटील हे केव्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार ही चर्चा सुरू असताना आज गुरुवारी चंद्रकांत पाटील हे उमेदवारी दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.

त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पुणे शहराचे ग्रामदैवत मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले.त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला असता ते म्हणाले की,आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र जी असून आमच्या पार्टीत एक शिस्त निर्माण केली आहे.देवेंद्र जी सांगतील तेव्हा ऐकायच आणि फार उत्सुकता देखील दाखवायची नाही.जेणेकरून त्यांना सांगण्याची सक्ती निर्माण होऊ नये.त्यामुळे कधी कधी लगेच सांगण हे सोयीच नसत, अशी भूमिका मांडत कसबा मतदार संघातील भाजपचा उमेदवार कोण असणार हे सांगण त्यांनी टाळल.

हेही वाचा >>>पुणे पोर्शे अपघात : अल्पवयीन चालकाच्या मित्राच्या वडिलांनाही अटकपूर्व जामीन नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचा मुख्यमंत्री पदासाठी चेहरा समोर येत आहे.त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की,त्यांच्या पार्टीचा अंतर्गत प्रश्न आहे.पण सत्ता आली तरच मुख्यमंत्रीपदाचा विषय आहे ना, यंदा महायुतीची सत्ता येणार आहे.२३ तारखेला निकाल लागल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पार्लमेंट्री बोर्डाची बैठक होईल.त्यामध्ये निर्णय घेऊन २४ तारखेला आमचा मुख्यमंत्री शपथ घेईल अशी भूमिका मांडत,महायुतीमधील कोणता नेता मुख्यमंत्री होणार, यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देण टाळल.