विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तत्कालीन उमेदवार आणि माजी नगरसेवक ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे.

हेही वाचा >>> पिंपरी चिंचवड : शंभर खोके मातोश्री ओके , ठाकरे- पवार चोर है अशा घोषणा देत वेदांता- फॉक्सकॉनवरून भाजप आक्रमक

सन २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला होता. या निवडणुकीतील निकालाला ॲड. किशोर शिंदे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ॲड. शिंदे यांची याचिका फेटाळून चंद्रकांत पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. ॲड. शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल होती. सर्वोच्च न्यायालयानेही ॲड. शिंदे यांची याचिका फेटाळून लावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.