पुणे : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड शनिवार आणि रविवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यातील लवळे येथील एका खासगी विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. तसेच लोणावळा येथील कैवल्यधाम येथील योग संस्थेला भेट देणार आहेत. त्यांचा पुण्यात एक दिवस मुक्कामही असणार आहे. पुणे दौऱ्यासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड हे दिल्ली येथून मुंबईत येणार आहेत. मुंबईहून ते पुण्याला येणार आहे. एक दिवस त्यांचा पुण्यात मुक्काम असणार आहे.

हेही वाचा : एमपीएससीतर्फे विविध विभागांमध्ये मोठी भरती, अर्ज प्रक्रिया १२ डिसेंबरपासून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील एका खासगी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी चंद्रचूड उपस्थित राहणार आहेत. तसेच लोणावळा येथील कैवल्यधाम येथील योग संस्थेला भेट देणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर गावचे आहेत. कनेरसर येथे त्यांचा वाडा आहे. या ठिकाणी सन २०१६ मध्ये कनेरसर येथे चंद्रचूड एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी या वाड्याला भेट दिली होती.