पुणे : हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चाच्या नियोजनासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. मुंबई येथे होणाऱ्या या मोर्चात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे निश्चित करण्यात आले असून, विद्यार्थी आणि पालकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याबाबतची स्पष्ट भूमिका घेतली असून, मुंबई येथे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर शहर मनसे पदाधिकाऱ्यांची नियोजनासंदर्भात बैठक झाली. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, सरचिटणीस अजय शिंदे, बाळा शेडगे, रणजित शिरोळे यांच्यासह संघटक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुखांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हिंदी सक्तीविरोधातील या मोर्चामध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, यासाठी शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. पालकांनी तयारी दर्शविली, तर त्यांच्यासाठी वाहन व्यवस्थाही केली जाणार आहे. या संदर्भात शनिवारी (२८ जून) पिंपरी-चिंचवड येथे त्यानंतर जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे,’ असे राजेंद्र वागसकर यांनी सांगितले.