कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने वगळता उर्वरित १४ ही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याची नोटीस शुक्रवारी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “त्या कुटुंबाबर ओरखडे ओढण्यापेक्षा बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे”; नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे विधान

कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांच्यावर विजय मिळविला. या मतदार संघात दोन लाख ७५ हजार ७१७ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ३६ हजार ९८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी ५१.६ टक्के मतदान झाले होते. त्यापैकी धंगेकर यांना ७३ हजार ३०९, तर रासने यांना ६२ हजार ३९४ मते मिळाली. काँग्रेस, भाजप व्यतिरिक्त सैनिक समाज पक्षाचे तुकाराम डाफळ यांना १५३, प्रभुद्ध रिपब्लिक पार्टीचे बलजितसिंग कोच्चर यांना ५१, राष्ट्रीय मराठा पक्षाचे रविंद्र वेदपाठक यांना ४१ मते मिळाली. याशिवाय ११ अपक्षांना मिळून १०३२ मते मिळाली. २२ मते बाद ठरली, तर २७ बनावट मतदान झाले, अशी माहिती कसबा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.

हेही वाचा- कसब्याची पुनरावृत्ती कोथरूडमध्ये?

दरम्यान, नोटा पर्याय वगळता झालेल्या मतदानापैकी १६ टक्के मते मिळविणे आवश्यक होते. तो आकडा कसब्यात २२ हजार ८०० एवढा होता. म्हणजेच अनामत रक्कम वाचविण्यासाठी एवढी मते मिळविणे आवश्यक होते. मात्र, धंगेकर आणि रासने वगळता उर्वरित १४ उमेदवारांना २२ हजार ८०० मते मिळविता आली नाहीत. त्यानुसार या १४ उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याची नोटीस पाठविण्याचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले, असेही किसवे-देवकाते यांनी सांगितले.

हेही वाचा- महापालिका निवडणुकीत चिंचवडमध्ये भाजपसमोर आव्हान

अनामत रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळी असते. लोकसभा निवडणुकीसाठी अनामत रक्कम खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला २५ हजार, तर अनुसूचित जाती-जमाती उमेदवाराला १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागते. विधानसभा निवडणुकीसाठी खुला प्रवर्ग दहा हजार रुपये, तर अनुसूचित जाती-जमाती उमेदवारासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. जिंकणाऱ्या उमेदवाराला त्याची अनामत रक्कम परत दिली जाते. त्याला १/६ टक्क्यांहून कमी मते मिळाली, तरी ही रक्कम परत केली जाते. तसेच मतदान सुरू होण्यापूर्वी जर कोणत्याही उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना अनामत रक्कम परत केली जाते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deposit amount of 14 candidates confiscated in kasba by election pune print news psg 17 dpj
First published on: 03-03-2023 at 21:33 IST