पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील माेशी परिसरातील गायकवाड वस्ती, तळेकरनगर, बाेराटे वस्ती, शिव रस्त्यावरील अनेक गृहनिर्माण साेसायट्यांमध्ये एप्रिल महिन्यामध्ये दूषित पाणीपुरवठा झाला. पाण्याला दुर्गंधी येत हाेती, अशी कबुली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी नियमितपणे पाण्याची तपासणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
माेशी भागात एप्रिल महिन्यामध्ये दूषित पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामाेरे जावे लागले. त्याबाबत शासनाने काेणत्या उपाययाेजना केल्या आहेत, असा तारांकित प्रश्न आमदार उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी विचारला हाेता.
त्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लेखी उत्तर दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील माेशी भागातील गायकवाड वस्ती, तळेकरनगर, बाेराटे वस्ती, शिव रस्त्यावरील अनेक गृहनिर्माण साेसायट्यांमध्ये एप्रिल महिन्यामध्ये दूषित पाणीपुरवठा झाला. पाण्याला दुर्गंधी येत हाेती. निघाेजे येथील इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यावरून महापालिका पाणी उचलते.
चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात त्यावर प्रक्रिया केली जाते. तेथून माेशी परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. ‘या भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी निघाेजे बंधारा येथे ‘एरिएटर’ बसविण्यात आले आहे. त्यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण वाढले. गुणवत्तेत सुधारणा झाली. जलपर्णी काढण्यात आली आहे.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निघाेजे बंधाऱ्याची दुरुस्ती व देखभालीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माेशी भागात स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या नियमितपणे चाचण्या केल्या जात आहेत,’