पुणे : पुणे पोलिसांनी तीन हजार ७०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असून पुणे पोलिसांची ही कारवाई अभिनंदनास पात्र आहे, असा शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांचे कौतुक केले. पोलिसांच्या संबंधित पथकाला २५ लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले.

पुणे पोलिसांकडून कुरकुंभ, दिल्ली, सांगली येथे छापे टाकून मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. पुण्यात अमली पदार्थ तयार करून परदेशात पाठविण्यात येत असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे पोलिसांचे कौतुक करण्यासाठी शनिवारी पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे उपस्थित होते.

हेही वाचा…रायगडकडे जाताना वाट वाकडी करून राजेश टोपे अजित पवारांच्या भेटीला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस म्हणाले की, पुणे पोलिसांची ही कारवाई अलीकडच्या काळातील देशभरातील मोठी कारवाई मानली जात आहे. तब्बल तीन हजार ७०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील पोलिसांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अमली पदार्थ विक्री आणि तस्करीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही. ते काम अमली पदार्थ करतात. अमली पदार्थ सेवनामुळे तरुण पिढी उद्धस्त होते. अमली पदार्थ तस्करी आणि विक्री म्हणजे देशविरोधी गुन्हा आहे, असेही फडणवीस म्हणाले.