पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीची उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला खासदार शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, सुनील शेळके, सुनील कांबळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. ही बैठक वादळी ठरली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके, खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा – शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच, पण..; सुनील शेळके नेमकं असं का म्हणाले?

हेही वाचा – पिंपरी : धक्कादायक! श्वान मादीवर लैंगिक अत्याचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामती आणि शिरुर लोकसभा क्षेत्रात विकास काम करण्यासाठी निधी दिला जात नाही, मात्र दुसर्‍या बाजूला मावळसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी बैठकीमध्ये मांडली. त्यावर ताई आमच्या मतदारसंघाचा उल्लेख सारखा का करता. ज्यावेळी बारामती करीता मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता, त्यावेळी आम्ही कधी बारामती बारामती म्हटले का ? असा सवाल शेळके यांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळे आणि सुनील शेळके यांच्यातील वाद लक्षात घेत निधी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करू आणि नक्की निधी दिला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितल्यानंतर दोघांमधील वाद थांबला. त्यानंतर इतर प्रश्नांवर चर्चा सुरू झाली.