मुंबईतल्या डोंगरी भागात असलेली केसरबाई इमारत खेकड्यांनी पाडली असे सरकारने जाहीर करून टाकावे असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.  तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं असं वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं त्याचाच संदर्भ घेत अजित पवारांनी आता डोंगरी इमारत दुर्घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा टोला लगावला आहे.

मुंबईतल्या डोंगरी भागात असलेली केसरबाई इमारत कोसळून १३ जण ठार झाले आहेत. ही इमारत शंभर वर्षे जुनी होती. या इमारतीत १० ते १५ कुटुंबं रहात होती. या सगळ्यांवरच काळाने घाला घातला. इमारत मोडकळीला आली होती तिच्या दुरूस्तीचे काम विकासकाकडे दिले होते तर ते पूर्ण का करण्यात आले नाही? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला गेला. आता अजित पवार यांनीही ही इमारत खेकड्यांनी पाडली असे सांगून टाका असे म्हणत सरकाला टोला लगावला आहे.

डोंगरी भागात मुंबईमध्ये तर सारख्या इमारती पडत आहेत. अनेक नागरीक मृत्युमुखी पडत आहेत. अनेकांचे जीव जात आहेत, तरी देखील हे सरकार कठोर निर्णय घेत नाहीत. मध्यंतरी तिवरे धरण फुटलं हे खुशाल सांगतात खेकड्यांनी धरण फोडले आहे. ‘ खेकड्यांचा जीव केवढा धरण केवढं’ किती खोटं बोलावं आता तर डोंगरी परिसरातील इमारत खेकड्यांनी पडली आहे का? असा प्रश्न वेळ नागरिकांवर आली आहे.

याचवेळी त्यांनी ईव्हीएमवरूनही सरकारवर टीका केली.  ईव्हीएम बद्दल अनेकांची वेगववगळी मतं आहेत. मध्यंतरी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक निकाल एकतर्फी लागले आहेत असे काही जणांचं म्हणणं आहे . त्यामुळे ईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी गडबड आहे असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. जगामध्ये ताकदीच्या देशात मशीनद्वारे निवडणूक न घेता त्या बॅलेट पेपरवर घेतल्या जातात. काही राजकीय पक्षांनी मागणी केली आहे की, किमान लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक तरी बॅलेट पेपरवर घ्याव्यात त्यामुळे कोणाच्या मनात असणाऱ्या शंका दूर होतील. चिप बदलली जाते, रिमोट ने काहीतरी केले जाते असे सांगितले जाते गेल्यामुळे लोकांचा १०० टक्के गैरसमज दूर करण्याकरिता एका राहायची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हरकत नाही असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.