पिंपरी : हिंदी सिनेसृष्टीतीला अभिनेता गोविंदा शिवसेनेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत करत कलाकार हा कलाकार असतो. त्याचा अपमान करणाऱ्याला जनता धडा शिकवेल, असे म्हटले होते. गोविदांचे स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करुन आपला जाज्वल्य इतिहास, खरा इतिहास पोहोचवणाऱ्या माझ्या सारख्याच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आती ज्यांनी पक्ष बदलला ते शिवाजीराव आढळराव पाटील हे नाटक्या, नौटंकी म्हणत हिणवतात अशी खंत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. तसेच कलाकारांची कदर केल्याने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, की गेली काही वर्षे सातत्याने शिरूर लोकसभा मतदार संघातल्या जनतेने माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीला लोकसभेत निवडून दिले. त्यानंतर शेलक्या शब्दांमध्ये जे कायम हिणवल जात होते. मग नाटक्या असेल, नौटंकी असेल आणि खरोखर मग प्रश्न पडतो. हिंदी सिनेसृष्टीतला सिनेस्टार आला तर मग त्यांचे स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करुन आपला जाज्वल्य इतिहास, खरा इतिहास पोहोचवणाऱ्या माझ्या सारख्याच्या बाबतीत मुख्यमंत्री शिदे यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आता ज्यांनी पक्ष बदलला ते सातत्याने अशी टीका टिप्पणी करतात.

हेही वाचा…“पाच वर्ष पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन द्या”; पुण्यात झळकले बॅनर्स

त्यामुळे मुखमंत्री शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त केले. आता त्यांनी हे जे समन्वयाची महत्वाची बाब आहे. ती त्यांच्या ही निदर्शनास आणून द्यावी. अभिनेता गोविंदा एकदा खासदार होते. तेव्हाचा त्यांची कामगिरी बघावी. आणि मला थोडीशी पातळी सोडून नाटक्या अशा शब्दात जर कोणी हिणवत असेल त्यांनी २०१९ ते २०१४ यामधला माझी संसदेतील कामगिरी तपासून पाहावी. पहिल्याच वेळी तब्बल तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर शिरूर मतदार संघाचे अनेक प्रश्न हे मार्गी लावल्यानंतर कोण अशा पद्धतीने टीका करत असेल तर त्यातून ज्याची त्याची संस्कृती दिसते. यापलीकडे काय बोलणार असे म्हणत डॉ. कोल्हे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.