पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रूग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविला आहे. डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास डाॅ. ठाकूर यांना अटक होण्याची शक्यता आहे.

अमली पदार्थ तस्कर ललित ससूनमधून पसार झाल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डाॅ. संजय मरसाळे यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. यापूर्वी येरवडा कारागृहातील समुपदेशकाला गुन्हे शाखेने अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन पोलीस कर्मचारी, कारागृहातील दोन कर्मचारी, तसेच ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यासह २० जणांना अटक करण्यात आली आहे. डॉ. ठाकूर यांंना पदमुक्त, तर डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा… प्रवाशांना खुशखबर! पुणेरी मेट्रो स्थानकांत स्वतंत्र वाहनतळाची सुविधा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कारागृहातून ससून रुग्णालयात उपचाराच्या बहाण्याने दाखल झालेल्या पाटील २ ऑक्टोबर २०२३ रोजी पसार झाला होता. ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयाच्या परिसरात ललितच्या साथीदाराकडून दोन कोटी ३२ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.