पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मंगळवारी (१२ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधानांचा दौरा, तसेच सभेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात ड्रोन कॅमेरे, तसेच पॅराग्लाडरच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली असून, आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी शहरात आगमन होणार आहे. लोहगाव विमानतळ ते पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधानांची सभेच्या ठिकाणी ड्रोन कॅमेरे वापरास बंदी घालण्यात आली आहे. पॅराग्लायडर, हलकी विमाने (मायक्रो लाइट एअरक्राफ्ट), हाॅट एअर बलूनच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. संभाव्य घातपाती कारावायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.

हेही वाचा >>> स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त रंजकुमार शर्मा यांनी दिला आहे. पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सभा, तसेच पंतप्रधानांचा ताफ ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून करण्यात येणार आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर शहरातील हाॅटेल, लाॅज, तसेच संशयितांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.