पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दहशतवादविरोधी पथकाने पकडले आहे. त्याच्याकडून ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एम डी (मेफेड्रोन)  जप्त करण्यात आले. महंमद फारुख महंमद उमर टाक (वय ४३, रा. म्हाडा कॉलनी, अंधेरी पश्चिम, मुंबई, मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या अमली पदार्थ तस्कराचे नाव आहे.

याबाबत दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौका रस्त्यावर  एक जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने तेथे सापळा रचून महंमद टाक याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एम डी अंमली पदार्थ सापडले. त्याच्याकडून मोबाईल, डिजिटल वजन काटा, २ हजार ५९० रुपये रोख, आधारकार्ड, डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत पोलीस हवालदार अशोक पेरणेकर यांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संतोष सुभाळकर, सहायक निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस हवालदार पेरणेकर,शिंदे, गुंजाळ यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक विश्वास भास्कर तपास करीत आहेत.