पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी पुण्यातील वकिलांची कृती समिती | Executive of Advocates for Bench of Bombay High Court pune print news amy 95 | Loksatta

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी पुण्यातील वकिलांची कृती समिती

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात सुरू करण्यासाठी पुण्यातील वकिलांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी पुण्यातील वकिलांची कृती समिती
मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात सुरू करण्यासाठी पुण्यातील वकिलांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. मंगळवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात पार पडलेल्या बैठकीत कायमस्वरुपी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशनने घेतला.राज्याच्या विधीमंडळाने १९७८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे आणि औरंगाबाद येथे स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला. ४४ वर्षे उलटले तरी पुण्याचे खंडपीठ अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील पक्षकारांची मोठी गैरसोय होत आहे.

हेही वाचा >>> ‘पीएफआय’बरोबरील रद्द करारावरून राजकारण; पुण्यात भाजप, राष्ट्रवादी यांची परस्परांवर टीका

उच्च न्यायालयाचे खंडपीठ शहरात लवकर सुरू व्हावे, या मागणीसाठी पुणे बार असोसिएशनकडून मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. अहमदखान पठाण, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. डॉ. सुधाकर आव्हाड, ॲड. डी. डी. शिंदे, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, ॲड. लक्ष्मण येळे पाटील, सचिव ॲड अमोल शितोळे, ॲड. सुरेखा भोसले, ॲड. प्रथमेश भोईटे, ॲड. शिल्पा कदम आदी या प्रसंगी उपस्थित होते.

हेही वाचा >>> मेट्रोची धाव स्वयंचलित; वेगवान आणि सुरक्षित प्रवासासाठी सीबीटीसी चाचणीला प्रारंभ

खंडपीठाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्यासाठी लवकरच कायमस्वरुपी कृती समिती स्थापन करण्यात येईल. पुण्यात खंडपीठ होण्यासाठी या समितीकडून कामकाजाची दिशा ठरवली जाईल, असे ॲड. थोरवे यांनी सांगितले. पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होणे गरजेचे असल्याचे मत ॲड. सुधाकर आव्हाड, ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. अहमदखान पठाण, ॲड. राजेंद्र उमाप यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : उपाहारगृहाची थाळी घरपोहोच देण्याच्या आमिषाने पाच लाखांना गंडा ; सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा

संबंधित बातम्या

पुणे : महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ गुरूवारी पिंपरी-चिंचवड बंदचे आवाहन
पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ
पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी
पुणे: पाडव्याला वहीपूजनासाठी संध्याकाळी मुहूर्त
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात गृह खात्याच्या निवृत्त उपसचिवांची साक्ष

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबईचा कायापालट करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
हार्दिकशी लग्नगाठ बांधल्यानंतर अक्षया भावूक; लग्नाची तारीख कोरलेल्या नखांचा फोटो शेअर करत म्हणली…
Video: “तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून…”; सुनावणीदरम्यान हायकोर्टातील न्यायमूर्तींचा सरकारी अधिकाऱ्याला अजब प्रश्न
IND vs BAN 2nd ODI: मेहदी हसनच्या नाबाद शतकाच्या जोरावर, बांगलादेशचे भारताला २७२ धावांचे लक्ष्य
युरिक ऍसिडचा त्रास झटक्यात कमी करा; काजू बदमासह ‘हे’ पाच नट्स करतील अमृतासमान काम