पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजप एकत्रित येत, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. तर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर महिलावरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आता भाजप सोबत गेल्याने त्यांच्यावर भाजपमधील नेते मंडळी आरोप करणार का असा प्रश्न उपस्थित झाला असताना. पुणे जिल्ह्यातील थेउर येथील यशवंत सहकारी साखर काराखान्याच्या मोकळ्या जागेत एका तरुणीचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना काल उघडकीस आली.त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीं सोबत संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे.त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या की,आता हाच प्रश्न तुम्ही पुणे पोलिस आयुक्तांना जाऊन विचारावा,मी माझी लढाई अजून ही लढत आहे.हे प्रकरण कोर्टात दाखल आहे.तसेच पुणे पोलिसांनी कोणत्या आधारे संजय राठोडला क्लिन चिट दिली.याबाबत मला माहिती नसून त्याबद्दल पोलिसांना कोर्टात सांगावे लागणार आहे.त्याच बरोबर आता युतीमध्ये आल्यावर, मी काही केस मागे घेतलेली नाही. माझा हा लढा चालूच राहणार आहे.अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

पाहा व्हिडीओ –

तसेच ते पुढे म्हणाले की, रघुनाथ कुचिक याने अटी आणि शर्तीचा भंग करून देखील, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.त्या बाबत देखील माझा लढा सुरू असून त्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही. तसेच औरंगाबाद येथील घटनेतील तरुणीला देखील न्याय मिळाला नाही. त्याबाबत देखील माहिती राज्यातील जनते समोर येईल, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight against sanjay rathore chitra wagh rebel mlas women allegations ysh
First published on: 06-07-2022 at 16:44 IST