लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर फिनिक्स मॉल परिसरात घबराट उडाली. मॉलमधील ग्राहक आणि व्यावसायिक बाहेर पडल्याने आवारात गर्दी झाली होती.
आणखी वाचा-पुणे : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी; सॅलिसबरी पार्कात छापा
फिनिक्स मॉलमध्ये आग लागल्याची माहिती शुक्रवारी दुपारी अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाचे सहा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा सुरू केला. आगीमागचे कारण समजू शकले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत असून, सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.