scorecardresearch

कर्वे रस्त्यावर इमारतीच्या तळमजल्यावर आग

कर्वे रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची घटना घडली.

कर्वे रस्त्यावर इमारतीच्या तळमजल्यावर आग
संग्रहित छायाचित्र

पुणे : कर्वे रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वीस मिनिटातआग आटोक्यात आणली. शॅार्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली.

नळस्टॅाप चौकातील एका इमारतीत स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या इमारतीच्या तळमजल्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या एरंडवणे केंद्रातील जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग १५ ते २० मिनिटात आग आटोक्यात आणली. तळमजल्यावर चार मोठे पंखे होते. त्या पैकी एका पंख्यात बिघाड होऊन शॅार्ट सर्किट झाले. आगीत कोणतीही  हानी झाली नाही.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.