NDA : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) आज (३० मे) दीक्षान्त संचलन (पासिंग आउट परेड) पार पडले आहे. हे दीक्षान्त संचलन ऐतिहासिक ठरले आहे. कारण यावेळी १४८ व्या तुकडीचं संचलन हे ‘एनडीए’मधील महिला छात्रांनी केलं असून महिला छात्रांची पहिली तुकडी यंदा उत्तीर्ण झाली आहे. यावेळी माजी लष्करप्रमुख तथा मिझोरामचे राज्यपाल व्ही.के.सिंग यांच्याकडून या संचलनाची पाहणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेल्या निर्णयानंतर महिलांना ‘एनडीए’मध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली. त्यानुसार २०२२ मध्ये ‘एनडीए’साठीच्या प्रवेश प्रक्रियेत पात्र ठरलेल्या महिला छात्रांना ‘एनडीए’मध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर जवळपास तीन वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या महिला छात्रांची पहिली तुकडी आता उत्तीर्ण झाली असून देशाच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.
‘एनडीए’चा पदवी प्रदान सोहळा पार पडला असून जनरल (नि.) व्ही.के.सिंग हे दीक्षान्त संचलनाला ‘पासिंग आउट परेड’ला उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या छात्रांना पदक प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी व्ही.के.सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील महिला छात्रांना मार्गदर्शन देखील केलं. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.
#WATCH | Maharashtra | Passing Out Parade of 148th Course, National Defence Academy (NDA) underway in Pune.
— ANI (@ANI) May 30, 2025
The parade is being reviewed by General VK Singh, PVSM, AVSM, YSM (Retd), Governor of Mizoram & former Chief of the Army Staff (COAS).
(Source: National Defence Academy) pic.twitter.com/R8qdjStG16
व्ही.के.सिंग यांनी काय म्हटलं?
“आज अकादमीच्या इतिहासात एक अनोखा आणि महत्त्वाचा दिवस आहे. आज एनडीएमधून महिला छात्रांची पहिली तुकडी उत्तीर्ण झाली आहे. हा आमच्या प्रवासातला एक ऐतिहासिक टप्पा आहे, जो सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या तरुणी ‘नारी शक्ती’चे प्रतीक आहेत. ज्या केवळ महिला विकासाचेच नव्हे तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे प्रतीक आहेत”, असं व्ही.के.सिंह यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Pune, Maharashtra | General VK Singh, PVSM, AVSM, YSM (Retd) says, "Today is also a uniquely significant day in the history of the academy, the first batch of female cadets pass out from NDA today. This marks a historic milestone in our collective journey towards… https://t.co/Q1mwicI7Og pic.twitter.com/E26SxZZo2I
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— ANI (@ANI) May 30, 2025
दरम्यान, पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) १४८ व्या तुकडीमध्ये महिला छात्रांनी तीन वर्षांचं खडतर प्रशिक्षण घेतलं आहे. या तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षण काळात या रणरागिणींनी अनेक अडथळ्यांचा सामना केला. यानंतर आता त्या पासआऊट झाल्या असून आता त्या देशाच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. या बरोबरच यावेळी ३०० पेक्षा जास्त पुरुष छात्र देखील एनडीएतून ग्रॅज्युएट होत आहेत.