पुणे : चांदणी चौकातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी अस्तित्त्वातील उड्डाणपूल पाडण्याचे काम १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा : चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्याच्या पूर्वतयारीला आजपासून सुरूवात

mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Navi Mumbai Municipality Expands Waste Management Scope Introduces waste e Transportation Syste
नवी मुंबई : लवकरच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधा, कचरा वाहतूक व संकलनासाठी अखेर निविदा प्रसिद्ध

हेही वाचा : पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकची दुचाकीस्वार मायलेकींना धडक; अपघातात महिलेचा मृत्यू

हा पूल पाडण्याचे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आठ सप्टेंबर रोजी पुलाची पाहणी केली आहे. त्यानुसार १२ सप्टेंबरपासून पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आहे. १५ सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पुणे कार्यालयाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे : उत्सवी उत्साहातही रुग्णवाहिकांना मार्ग देण्यासाठी पोलिस आणि नागरिक तत्पर

असा असेल वाहतूक बदल

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व मुळशीकडून पाषाण, बावधन, कोथरुड वारजेकडे जाणारी वाहतूक ही नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरून (क्रमांक १) वरून सोडण्यात येणार आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, मुळशीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही उड्डाणपूल क्रमांक ३ मार्गे उड्डाणपूल क्रमांक ७ वरून सोडण्यात येणार आहे. पाषाण आणि अन्य मार्गांवरील वाहतूक ही पूर्वीप्रमाणेच असणार आहे.

 मुंबई ते कोथरुड ही वाहतूक अस्तित्वातील कोथरुड मार्गे सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही.

कोथरूड ते मुंबई ही वाहतूक कोथरुड भुयारीमार्ग ते वेदविहार मार्गे असणार आहे.

कोथरुड ते सातारा, वारजे ही वाहतूक वेदभवन सेवा रस्त्यावरील श्रृंगेरीमठाजवळून महामार्गावरून सातारा आणि वारजेकडे वळविण्यात येणार आहे.