लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: उत्तरप्रदेश विधानसभेचे आमदार आणि मंत्री असल्याची बतावणी करत टोळीने पुण्यातील एका मार्बल व्यवसायिकाला ३० लाख रुपयांच्या नोटा देण्याचे प्रलोभन दाखवत पाच लाख ३४ हजार रुपायंची फसवणूक केली. त्यानंतर कोणाला याबाबत काही सांगितले, तर पिस्तुलाच्या धाकाने जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.

या प्रकरणी गणेश राजपुरोहित (वय ५४ रा. खराडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रूपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर उर्फ विशाल घोगरे (सर्व रा. निलंगा, जि. लातूर) व अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्या विरुद्ध आर्म अ‍ॅक्टसह फसवणुकीचा  गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० मार्च ते २० एप्रिल या कालावधीत घडली आहे. सर्व आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा… पिंपरी: प्रेयसीसोबत राहण्यासाठी पतीने केले पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपुरोहित हे मार्बल व्यवसायिक आहे. २६ मार्च रोजी खराडी बायपास येथे चहा पित असताना, त्यांची आरोपी महिला रूपाली हिच्यासोबत ओळख झाली होती. त्यावेळी तिने आपली आमदार, खासदारांसोबत ओळख असल्याचे सांगून तिप्पट पैसे मिळवून देण्याबाबत योजना असल्याचे सांगितले. तिने आरोपी पांडे हा उत्तरप्रदेश सरकारमध्ये मंत्री असून त्याच्यासोबत फिर्यादीचे बोलणे करून दिले. त्याने पाच लाख रुपये दिले तर ३० लाख रुपये परत मिळतील असे सांगितले. फिर्यादी या प्रलोभनाला बळी पडले. ३० मार्च रोजी ते एसआरपीएफ ग्रुप परमारनगर येथे भेटले. पांडे हा आपल्या साथीदारासोबत तेथे आला होता.

हेही वाचा… पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर विचित्र अपघात; १० पेक्षा जास्त वाहने एकमेकांना धडकली

फिर्यादींना आरोपींनी आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी बनावट नोटा कशा असतात व त्या केमिकलद्वारे कशा तयार केल्या जातात याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून हे कोणाला सांगितले तर ठार मारू अशी धमकी दिली. फिर्यादीने सुरुवातीला चार लाख रुपये त्यांच्या हवाली केले. त्यानंतर देखील त्यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण ५ लाख ३४ हजार रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर देखील तिप्पट पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पांडे, रूपाली यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा… गुलाबजामवरुन विवाह समारंभात हाणामारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, त्यांनी संपर्क बंद केला. तसेच वारंवार त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यान अपहार आणि आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.