पुणे : मध्य रेल्वेची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस २० प्रवासी डब्यांची असणार आहे. चार डबे वाढविण्यास रेल्वे बोर्डाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून (२८ जुलै) मुंबई, पुण्यातील प्रवाशांबरोबरच दौंड, कुर्डवाडी, सोलापूर येथील प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

पुणे ते सोलापूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस १६ प्रवासी डब्यांची होती. ही रेल्वे पुणे स्थानकावरूनच मार्गस्थ होते. त्यामुळे सोलापूर ते पुणे या मार्गावर सर्वाधिक प्रवासी संख्या जास्त आहे. कमी कालावधीत जलद गतीने प्रवास होत असल्याने प्रवाशांकडून डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला होता. रेल्वे बोर्डाने प्रवाशांचा प्रतिसाद पाहता चार जादा डबे जोण्यासाठी परवानी दिली. याची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात येणार असल्याने मुंबई-पुणे-सोलापूर आणि दौंड, कुर्डूवाडी या भागातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणर असल्याची माहिती, रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई-सोलापूर साडेसहा तासांत

आठवड्यातून सहा दिवस (बुधवार वगळता) मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे, कल्याण, पुणे, कुर्डूवाडी या पाच स्थानकांवर थांबते. दररोज सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघते, सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पुणे स्थानकावर पोहचते, तर रात्री १० वाजून ४० मिनिटांनी सोलापूर स्थानकावर पोहोचते. दुसऱ्या दिवशी पहाटे ६.३० वाजता ही एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने पुन्हा निघते. या एक्स्प्रेसमुळे अवघ्या साडेसहा तासांत मुंबई-पुणे अंतर गाठणे शक्य होत आहे.

दिलासा काय ?

या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला मोठा प्रतिसाद असून प्रवाशांना आरक्षण मिळत नसल्याची तक्रार कायम होती. चार जादा डबे वाढविल्याने प्रवाशांची वहन क्षमता सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढणार आहे. प्रवाशांना सुलभ प्रवास करता येणार असून, प्रमुख स्थानकांच्या ठिकाणच्या प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येत होती. रेल्वे बोर्डाकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आजपासून २० प्रवासी डब्यांची संख्या असलेली वंदे भारत एक्सप्रेस नियोजित वेळापत्रकानुसार धावेल. – हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे