पुणे : ॲपवर नोंदणी केल्यानंतर खाद्यपदार्थ घरपोच पुरविणाऱ्या कामगाराने एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रईस शेख (वय ४०, रा. कोंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्या कामगाराचे नाव आहे. ॲपवर नोंदणी केल्यानंतर एका कंपनीकडून घरपोच खाद्यपदार्थ पुरविले जातात. शेख हा संबंधित कंपनीत कामाला आहे.
तरुणीने ऑनलाइन पद्धतीने घरपोच खाद्यपदार्थ मागविले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास शेख हा तरुणीच्या घरी खाद्यपदार्थ घेऊन गेला. त्या वेळी शेखने तरुणीला पाणी पिण्यास मागितले. तरुणीने पाणी भरून ग्लास दिल्यानंतर त्याने अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.