शनिवार वाडा बाजीराव पेशव्यांनी बांधला हे तर सर्वश्रुत आहे. इतिहास या गोष्टीची साक्ष देतो. मात्र, त्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाड्यामध्ये मोठे बदल केले. मस्तानी महाल, शनिवार वाड्यातली कारंजी अशा अनेक गोष्टींत नानासाहेब पेशव्यांनी बदल केले. गोष्ट पुण्याचीच्या या भागात नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाड्याला दिलेलं नवं रुप कसं होतं, ते आपण पाहणार आहोत.
शनिवार वाड्याच्या पहिल्या बांधकामात मूळ रचनेमध्ये काही बदल करण्यात आले होते.