पुणे : लोनॲपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारजेतील आकाशनगर परिसरात झालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा वारजे पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा पोलिसांनी गौरी सुनील डांगे (वय.२४) हिला ताब्यात घेतले आहे. सुलोचना सुभाष डांगे (वय.६५ ,रा.शुभम कॉलनी लेन क्रमांक दोन) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.

हेही वाचा : बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेची २२ लाखाची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार गौरी हिने लोनॲपद्वारे कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी तिला तगादा लावण्यात येत होता. त्यातूनच तिने मंगळवारी सकाळी आजीचा खून करून घरात चोरी झाल्याचा बनाव रचला. आजी घरात एकटी असताना उशीने तोंड दाबून तिचा गळा दाबला. त्यानंतर हातावर वार केले. आजीचे सोने घेऊन तिने पळ काढला होता. तपासादरम्यान पोलिसांना मुलगा आणि नातीवर संशय होत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलिस उपनरीक्षक नरेंद्र मुंढे यांच्या पथकाने मुलीकडे चोकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच नातीने आजीच्या खुनाची कबुली दिली.