पुण्यात जोरदार पाऊस; कोकणात आणि गोव्यात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे वेधशाळेने व्यक्त केला अंदाज

पुणे : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी संध्याकाळी शहरात दमदार हजेरी लावली.

राज्यातील अनेक भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली असून पुण्यात चार वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच उद्या कोकणात आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे शहरातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह दुपारी चारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. उद्या देखील विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या कोकण गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पडेल. तसेच राज्याच्या किनारपट्टीवर सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Heavy rains in pune heavy rains forecast in konkan and goa tomorrow aau 85 svk

ताज्या बातम्या