लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: हडपसर भागातील अमानोरा पार्क या उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य, हुक्क्याची सुगंधी तंबाखू, मोबाइल संच असा पाच लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आणखी वाचा-पुणे मेट्रो सुसाट, पण एसटी जागेवरच!

हडपसर भागातील अमानोरा पार्कमधील एका सदनिकेत काहीजण पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सदनिकेत छापा टाकला. पोलिसांनी सदनिकेतून दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४१ हजार रुपयांची रोकड, १४ हजार रुपयांची हुक्क्याची सुगंधी तंबाखू, जुगाराचे साहित्य असा पाच लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी वाचा-पुणे: कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घ्या! ‘एटीएस’कडून न्यायालयात अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, सागर केकाण, अमेय रसाळ, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ आदींनी ही कारवाई केली.