पिंपरी : महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जास्त जागा मिळत आहेत. परंतु, आम्ही केवळ दहा जागांवरच निवडणूक लढविणार असल्याची माहिती कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना पोषक वातावरण असल्याचा दावाही त्यांनी केला.

पक्षातील फुटीनंतर रोहित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहरातील दौऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पवार यांनी बुधवारी चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, महाविकास आघाडी एकजुटीने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. लवकरच जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल. आम्हाला जास्त जागा मिळत आहेत. परंतु, दहाच जागांवर निवडणूक लढविण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.

BJP state president, chandrashekhar bawankule, Criticizes sharad pawar NCP s Manifesto, Deceptive manifesto, bjp, sharad pawar ncp, lok sabha 2024, election 2024, election campaign, criticise, marathi news,
“शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शपथनामा’ ही जनतेची फसवणूक,” भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका, म्हणाले…
baramati tutari marathi news, independent candidate tutari baramati marathi news
बारामतीमध्ये ‘तुतारी’ चिन्हावरून वाद, अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आक्षेप
Chhagan Bhujbal On Mahayuti Seat Sharing
नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटणार? छगन भुजबळांचे सूचक विधान; म्हणाले, “महायुतीतील प्रत्येक पक्षाला ही जागा…”
Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका

हेही वाचा >>>पिंपरी : देहूरोडमध्ये ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाचा खून

‘सुप्रिया सुळेंना पोषक वातावरण’

पक्षातील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांची निवडणूक काटे की टक्कर होईल, असे दिसत होते. पण, विरोधकांकडून उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आल्यानंतर सुळे यांच्याबाबत सकारात्मक वातावरण सुरू झाले. त्यांना पोषक वातावरण आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात चांगली मते मिळतील. अहमदनगर, शिरूरसह अनेक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला धक्का बसेल, असा दावाही पवार यांनी केला.

हेही वाचा >>>पुणे : मोदींचा मेट्रोला हिरवा झेंडा! पिंपरी-चिंचवड ते निगडी मार्गाचे भूमिपूजन; रुबी हॉल ते रामवाडी सेवा सुरू

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ चार जागा?

महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ चार जागा मिळतील. महायुती लोकसभा निवडणूक एकत्रित लढवेल. पण, विधानसभा एकत्रित लढू शकणार नाहीत. लढलेच तर अजित पवारांना २० ते २२ जागा मिळतील. उर्वरित आमदारांना कमळाच्या चिन्हावर लढायला लावतील. विधानसभेला अजित पवारांसह केवळ सात ते आठ आमदार निवडून येतील. पवार यांचेही विधानसभेचे मताधिक्य घटेल. सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेकांसाठी विधानसभेची निवडणूक सोपी नसेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>पिंपरी : महापालिकेला ‘एसईआयएए’चा दणका! पवना, इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा…

लोकसभेनंतर पक्ष संघटनेतील जबाबदारी

पक्ष संघटनेतील जबाबदारी आताच स्वीकारणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर संघटनेत बदल होतील. त्यानंतरच मी जबाबदारी स्वीकारणार आहे. सध्या बूथ सक्षम करणे, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची माझ्याकडे जबाबदारी आहे. तीच पार पाडणार असून, निवडणुकीत जास्त भाषणे करणार नाही. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये, असेही ते म्हणाले.अजित पवारांबाबत नेहमीच आदर राहील. तो कमी होणार नाही. परंतु, त्यांनी बदललेल्या भूमिकेला विरोध आहे. वैयक्तिक कधीच बोलणार नाही. भूमिकेविरोधात बोलत राहील, असेही ते म्हणाले.