Pune Crime News Update: आर्थिक वादातून १४ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. या प्रकरणी शाहरुख मोहम्मदीन फिरोज खान, मरियम शाहरुख खान (दोघे रा. हुमेरा मंजिल, शेर खान चाळीसमोर, कोंढवा) यांना अटक करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे आरोपी शाहरूख याच्याशी आर्थिक व्यवहारावरून वाद झाले होते. सोमवारी (२२ सप्टेंबर) रात्री पावणेदहाच्या सुमारास आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी मरियम हे त्याच्या घरी गेले आणि शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपींनी अल्पवयीन मुलाच्या आईला मारहाण केली. तेव्हा अल्पवयीन मुलाने मध्यस्थी केली.

आरोपींनी मुलाला शिवीगाळ करुन त्याच्या छातीवर शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी शाहरूख आणि त्याची पत्नी मरियम यांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.