पुणे : वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने एका महिला अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका अभिनेत्रीने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार अभिनेत्री सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. अभिनेत्री एका समाजमाध्यमातील समूहात सदस्य आहे.

हेही वाचा : देखावे पाहण्यासाठी आजपासून गर्दी; पुण्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर होणार बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरट्याने काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. हैद्राबाद येथे एका वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू आहे. वेबसिरीजसाठी ऑडिशन द्यावी लागेल, असे चोरट्याने तिला सांगितले. पुणे ते हैद्राबाद विमान तिकिटाचे पैसे ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागतील, असे सांगून अभिनेत्रीकडून चोरट्याने १६ हजार ५६० रुपये घेतले. त्यानंतर चोरट्याने तिला तिकिट पाठविले नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे तपास करत आहेत.