पुणे : चारित्र्याच्या संशय घेणाऱ्या पतीच्या छळामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार भागात घडली. याप्रकरणी पतीसह नणंदेविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रियंका विनायक पाटील (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती विनायक अनंतराव पाटील (वय ३९, रा. चिंतामणी गार्डन, आंबेगाव पठार, धनकवडी), नणंद वनिता मोरे (रा. कराड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : पिंपरी: बेकायदा आधारकार्ड सेवा केंद्राद्वारे बनावट कागदपत्रे बनवणा-या टोळीचा पर्दाफाश; दाम्पत्यासह चार जण गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत प्रियंकाचे वडील तुकारम खंडू कदम (वय ६६, रा. लष्कर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंकाचा नऊ वर्षांपूर्वी विनायक याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर विनायकने पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेण्यास सुरुवात केली. तिला वेळोवेळी मारहाण करुन शिवीगाळ केली. विवाहात पंधरा लाख रुपये खर्च झाला अहो. विवाहाचा खर्च परत कर, असे सांगून तिचा छळ सुरू केला. छळामुळे प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तिच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.