पुण्यातील भाजप पुणे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरेने वरीष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे म्हणाले या प्रकरणी प्रमोद कोंढरे वर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे शहरातील शिवाजी रस्ता ते बाजीराव रस्त्यावरील प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्गाच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे २३ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आले होते. त्या कार्यक्रमापूर्वी भाजपचे स्थानिक आमदार हेमंत रासने हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चहा पिण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर गेले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे येणार असल्याने पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्या बंदोबस्तील काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हे देखील चहा पिण्यास गेले होते.त्यावेळी हेमंत रासने यांच्यासोबत असलेले सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी वरीष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना घडली. त्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा फरासखाना पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजल्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्यासोबत मी फोनवरून चर्चा केली.त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार त्यांनी मला सांगितला.त्यानंतर या प्रकरणाची चौकशी पूर्णपणे होऊपर्यत भाजपच्या सर्व पदापासून मुक्त करण्यात यावे,अशी मागणी प्रमोद कोंढरे यांनी केल्यावर,भाजप पुणे शहर कार्यालयाकडे प्रमोद कोंढरे यांनी राजीनामा दिला असून तो राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत पोलिस विभागामार्फत तपास करेल,त्या तपासात माहिती समोर येईल.त्यानंतर भाजप पुणे शहराकडून आवश्यक ती पुढील कार्यवाही केली जाईल – धीरज घाटे ,अध्यक्ष, भाजप पुणे शहर