scorecardresearch

Premium

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना तात्पुरता दिलासा, न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

ncp eknath khadse, pune court granted interim bail to ncp leader eknath khadse
भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना तात्पुरता दिलासा, न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश (संग्रहित छायाचित्र)

पुणे : भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे खडसे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात खडसे यांच्याविरुद्ध लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात अंतरिम जामीन मिळावा म्हणून खडसे यांनी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. विशेष न्यायाधीश जाधव यांनी खडसे यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.

हेही वाचा : एमपीएससीतर्फे विविध विभागांमध्ये मोठी भरती, अर्ज प्रक्रिया १२ डिसेंबरपासून

Advocate Prashant Bhushan
“सर्वोच्च न्यायालयातील एक तृतीयांश न्यायाधीश चांगले, इतर…”, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा आरोप
Proactive action against accused in Sharad Mohol murder case pune news
शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार गणेश मारणेचा शोध सुरूच
Gyanvapi Case
ज्ञानवापी प्रकरण : प्रार्थनास्थळांवरील कायदा अन् त्याच्या समोरील आव्हाने
Sharad Mohol Mulshi Pattern Pune
गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील ‘या’ मुख्य सूत्रधाराने केला अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज

या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी खडसे यांनी बुधवारी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. खडसे यांच्या जामीन अर्जावर तीन जानेवारी २०२४ रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती लाख लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. खडसे हे मंत्री असताना त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून भोसरी परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीची ४० कोटी रुपयांची जमीन पत्नी आणि सुनेच्या नावे तीन कोटी ७५ लाख रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. खडसे यांनी जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune court granted interim bail to ncp leader eknath khadse in bhosari plot misappropriation case pune print news rbk 25 css

First published on: 06-12-2023 at 20:40 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×