पुणे : सध्याचे दिवस रील्सचे आहेत. अनेक तरुण मनोरंजक रिल्स करत असतात. मराठी रिल्स करणाऱ्यांमध्ये पुण्यातील अथर्व सुदामे रिल सेलिब्रेटी आहे. अथर्वने अनेक मनोरंजक रिल्स करून नेटकऱ्यांची दाद मिळवली आहे. पुण्यात सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत अथर्व सुदामे त्याच्या मित्रांबरोबर सहभागी झाला, इतकेच नाही तर त्याने पुणेरी शैलीत अनोखा संदेशही दिला.

हेही वाचा : विसर्जन मिरवणुकीत मनमोहक रांगोळी, ढोलताशांचे वादन, पालकमंत्री दुचाकीवरून पोहोचले मंडईत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलालची उधळण करत गुरुजी तालीम गणपती लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. गुलालाने माखलेला रीलस्टार अथर्व सुदामे त्याच्या पवन वाघुलकर,डॅनी पंडित व इतर मित्रांसह मिरवणुकीत सहभागी झाला. या वेळी ‘ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका’ अशी पुणेरी पाटी हातात घेऊन रिल्सस्टार पवन वाघुलकरने खास पुणेरी शैलीत संदेशही दिला. पवन व अथर्व यांच्या पुणेरी पाटीमुळे अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.