scorecardresearch

Premium

पुणे : एकीकडे विसर्जनाचा उत्साह, दुसरीकडे पावसाच्या पाण्याने वाहणारे रस्ते

एकीकडे बँडवादन, ढोलताशाच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक शहरात ठिकठिकाणी सुरू असतानाच आलेल्या जोरदार पावसामुळे थोडा गोंधळ झाला. मात्र त्याचा उत्साहावर परिणाम झाला नाही.

pune , heavy rain , ganpati immersion procession
पुणे : एकीकडे विसर्जनाचा उत्साह, दुसरीकडे पावसाच्या पाण्याने वाहणारे रस्ते ( छायाचित्र – लोकसत्ता टीम )

पुणे : एकीकडे गणेश विसर्जनाचा उत्साह ओसंडून वाहात असताना दुसरीकडे मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्ते, ओढा भरून वाहात आहे. हवामान विभागाकडून गणेश विसर्जनाच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार सकाळी असलेले स्वच्छ ऊन जाऊन दुपारनंतर आकाश ढगाळ होऊ लागले. सायंकाळी चारच्या सुमारासच अंधारून आले. त्यानंतर जोरदार पावसाच्या तीन-चार सरी कोसळल्या. एकीकडे बँडवादन, ढोलताशाच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक शहरात ठिकठिकाणी सुरू असतानाच आलेल्या जोरदार पावसामुळे थोडा गोंधळ झाला. मात्र त्याचा उत्साहावर परिणाम झाला नाही.

हेही वाचा… Video: १२५० किलो रांगोळी, ७५० किलो रंग आणि ७०० किलो गुलाल; पुण्यातील गणेश मिरवणुकीत…

वसई : मत्स्य दुष्काळामुळे बोटी बंद ठेवण्याची वेळ, बंदीनंतर काही बोटी रवाना
A youth was brutally murdered by four to five people with sticks due to being hit by a bike akola
दुचाकीचा धक्का लागल्याचे कारण झाले अन् भररस्त्यात तरुणाला संपवले
buldhana, farmer died in leopard attack, dnyanganga wildlife sanctuary
बुलढाणा : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार; ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना
Malad
माणुसकीला काळिमा! मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान

हेही वाचा… Pune Ganpati Visarjan 2023 Live : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मार्गस्थ

शहराच्या सर्वच भागात बसरलेल्या जोरदार सरींनी शहरातील रस्त्यांना ओढ्याचे रूप येऊन ते वाहू लागले. सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, आपटे रस्ता अशा भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र होते. तसेच शहरातील आंबिल ओढाही भरून वाहू लागला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune heavy rains during ganpati immersion procession pune print news ccp 14 asj

First published on: 28-09-2023 at 18:44 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×