scorecardresearch

Premium

Pune Ganpati Visarjan 2023 Live : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मार्गस्थ

भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी सुसंगत श्री गणाधीश रथामध्ये विराजमान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नियोजित वेळेपूर्वी गुरूवारी मार्गस्थ झाला.

srimant dagdusheth halwai ganpati visarjan, ganesh visarjan pune
Pune Ganpati Visarjan 2023 Live : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मार्गस्थ (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी सुसंगत श्री गणाधीश रथामध्ये विराजमान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नियोजित वेळेपूर्वी गुरूवारी मार्गस्थ झाला. दरवर्षी मिरवणुकीला होणारा उशीर लक्षात घेता यंदा बेलबाग चौकातून दुपारी चार वाजता मंडळाची मिरवणूक सुरू करण्यात आली. लक्ष्मी रस्त्याने गणपती मार्गस्थ झाला आहे.

हेही वाचा : Pune Ganesh Visarjan 2023 Live : मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचे दुपारी साडेचार वाजता विसर्जन

truck driver, thief, Pune police, arrested, threatened, looted, fruit bazaar,knife market yard,
पुणे : मार्केट यार्डात ट्रक चालकाला चाकूच्या धाकाने लूटणारा गजाआड
pm modi lays foundation stone of kalki dham temple in lucknow
भारतरूपी मंदिर पुनर्निर्माणाची माझ्यावर ईश्वरी जबाबदारी!, कल्की धाम मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
Narendra Modi
“मोदींचा राक्षसी स्वभाव…”, काशी विश्वनाथ मंदिरावरून भाजपा नेत्याचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
young person murder kalyan body well crime
कल्याण मध्ये तरुणाची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला

उपमुख्यमंत्री अजित पवार विसर्जन मिरवणुकीला येणार होते मात्र ते मुंबईत असल्याने येऊ शकले नाहीत. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विसर्जन मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी आहे. प्रभात, दरबार ही बँडपथके, स्व-रूपवर्धिनीचे ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडांची मंडळाला साथ आहे

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune srimant dagdusheth halwai ganpati enrouted for visarjan pune print news apk 13 css

First published on: 28-09-2023 at 18:26 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×