पुणे : शहर हे पुणेरी पाट्यांसाठी प्रसिद्ध असून मागील काही वर्षांत निवडणुकीच्या काळात अनेक वेळा फ्लेक्सबाजीमधून नेत्यांना सुनावल्याचे पाहण्यास मिळाले आहे. तर आता लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असून भाजपाकडून पहिली यादी देखील जाहीर केली आहे. मात्र अद्यापपर्यंत इतर पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी आणि पक्षाअंतर्गत बैठका सुरू आहेत. पण या सर्व घडामोडींदरम्यान पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, सुनील देवधर तर काँग्रेस पक्षाकडून आमदार रविंद्र धंगेकर, मोहन जोशी आणि मनसेकडून वसंत मोरे, साईनाथ बाबर या नावांची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : “ज्या व्यक्तीचा मावळ मतदारसंघात थांगपत्ता नाही”; बारणेंच्या टीकेवर वाघेरे म्हणाले, “पक्ष बदलणाऱ्यांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच दरम्यान पुण्यात “स्टँडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीस पण दिलं… आता खासदारकी पण देणार ? आता बास झालं… तुला नक्की पाडणार ! – कष्टाळू भाजप कार्यकर्ते”अशा आशयाचा फ्लेक्स लावून मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे पुणे भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. तर या फ्लेक्सबाजीवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.