पुणे : कायद्यांतील बदलांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना शास्त्रीय साधनांचा उपयोग करणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे तपासी अमंलदारांनी तपासादरम्यान वैज्ञानिक दृष्टीकोन कोन अंगी बाळगण्यासह नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे मत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तव्य मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात शुक्ला बोलत होत्या. या वेळी बँडपथकाद्वारे पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. स्पर्धेत सहभागी २५ संघांनी संचलन करत मानवंदना दिली. पोलीस श्वानांनीही प्रात्यक्षिके सादर केली.राज्याचे माजी पोलीस महासंचालक कृष्णन, दत्ता पडसलगीकर, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागाचे अपर पोलीस महासंचालक दीपक पांडे, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, राज्य राखीव पोलिस बल परिक्षेत्र पुणेचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे, एमआयओचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे, सुधारगृह विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा…नाट्यगृहांमध्ये आता मराठी चित्रपटांचे प्रदर्शन; कलाकारांच्या मागणीला महापालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेस्ट टीम परफॉरर्मन्स ट्रॉफी दहशतवाद विरोधी पथकाला सायंटीफीक एड टू इनव्हेस्टीगेशन, कोल्हापूर परिक्षेत्राला पोलीस फोटोग्राफी, एसआरपीएफला पोलीस व्हिडीओग्राफी, कोल्हापूर परिक्षेत्राला संगणक सजगता, श्वान स्पर्धेसाठी तर घातपात विरोधी तपासणी आणि कै. अशोक कामटे फिरत्या चषकासाठी मुंबईच्या फोर्स वनला गौरविण्यात आले. मेळाव्यातील सर्वसाधारण विजेता संघ नागपूर शहर, उपविजेता संघ कोल्हापूर परिक्षेत्र तर गुन्हे अन्वेषण विभागाचा शताब्दी फिरता चषक विजेता नागपूर संघ ठरला.